Fire : जळगावात गोडाऊनला आग,सांगलीत टॅंकर पेटला,चंद्रपूरमध्ये शोरूमला आग,परभणीत साडी डेपो जळून खाक

Continues below advertisement

Maharashtra Fire News : राज्यातल्या विविध शहरांमध्ये अग्नितांडव पाहायला मिळालं. जळगावमधील तरसोद गावात एका गोडाऊनला आग लागल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालं. अग्निशमन दल आणि ग्रामस्थांनी मोठ्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. इकडे पेठ-सांगली मार्गावर पेट्रोल घेऊन जाणाऱ्या एका टँकरच्या केबिनमध्ये आग लागली. मात्र आष्टा पोलीस आणि अग्निशमन दल यांनी तातडनं आग नियंत्रणात आणल्यानं मोठा अनर्थ टळलाय. या टँकरमध्ये 1 हजार लिटर पेट्रोल होतं. चंद्रपुरात जायका मोटर्स या कार शोरूमला भीषण आग लागली. यात स्पेअर पार्ट्स, कॉम्प्युटर्स, कागदपत्रं जळून खाक जाले आहेत. विक्रीसाठी असलेल्या अनेक वाहनांचंही नुकसान झाल्याचं कळतंय तर इकडे परभणीमध्ये एका साडी डेपोला आग लागली यात संपूर्ण डेपो जळून खाक झाला असून त्यात लाखोंचं नुकसान झालंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram