Jalgaon : जळगावात संभाजी भिडे यांच्या मेळाव्यात कोरोना नियमांचं उल्लंघन ABP Majha

शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्या जळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात कोरोना नियमांचं उल्लंघन झालंय. याप्रकरणी आयोजकांसह तीनशे जणांवर चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. राज्य सरकारने ५० पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास बंदी घातलीय. सार्वजनिक कार्यक्रमात गर्दी जमवण्यास मज्जाव करण्यात आलाय. मात्र संभाजी भिडे यांच्या मेळाव्यात हे नियम धाब्यावर बसवल्याचं दिसून आलंय. या मेळाव्याला तीनशे ते चारशे जणांनी उपस्थिती लावली होती. यांत अनेकांनी मास्क लावले नसल्याचे पाहायला मिळालं. तसंच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं दिसून आलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola