Jalgaon महापालिकेवर शिवसेनेची सत्ता; नवनिर्वाचित महापौर जयश्री महाजन 'माझा'वर
जळगाव : जळगाव महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांची निवड झाली आहे. जयश्री महाजन यांना 45 मत पडली आहेत. तर भाजपच्या उमेदवार प्रतिभा कापसे यांना 30 मतं पडली. अधिकृत घोषणा थोड्याच वेळात होण्याची शक्यता आहे. महापौर निवडणुकीच्या अगोदरच सत्ताधारी भाजप मधील काही नाराज नगरसेवक गळाला लागल्याने महापौर शिवसेनेचाच होणार असा दावा करण्यात येत होता.