Cyber Alert Jalgaon : जळगावमध्ये धक्कादायक प्रकार, व्हॉट्सअपमुळे पावणे पाच लाखांना गंडा

Continues below advertisement
जळगाव (Jalgaon) येथील रहिवासी निलेश सराफ (Nilesh Saraf) यांना WhatsApp वरील एका चुकीमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. 'व्हॉट्सअपमधील ऑटो डाउनलोड (Auto-Download) सेटिंग सुरू राहिल्याने दिवाळीपूर्वीच माझं दिवाळं निघालं', अशी आपबिती निलेश सराफ यांनी सांगितली आहे. हॅकर्सनी त्यांच्या मोबाईलमधील WhatsApp च्या 'ऑटो डाउनलोड' सिस्टीमचा गैरफायदा घेत मोबाईल हॅक केला. या सायबर हल्ल्यात (Cyber Attack) निलेश सराफ यांना तब्बल पावणे पाच लाख रुपयांना मुकावे लागले, ज्यामुळे त्यांचे बँक अकाऊंट (Bank Account) पूर्णपणे रिकामे झाले. ऐन सणासुदीच्या काळात घडलेल्या या प्रकारामुळे सराफ कुटुंबियांवर मोठं संकट ओढवलं आहे. या घटनेमुळे मोबाईल वापरताना, विशेषतः WhatsApp सारखे ॲप्स वापरताना कोणती सेटिंग्ज सुरू आहेत, याबाबत सावधगिरी बाळगण्याचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola