Jalgaon Gold : सोन्याचे दर काय? सोनं खरेदीसाठी महिलांची गर्दी
Jalgaon Gold : सोन्याचे दर काय? सोनं खरेदीसाठी महिलांची गर्दी
अमेरिकेत मंदीची लाट येण्याची शक्यता,त्याच बरोबर इराण आणि इजरायल देशातील तणाव पूर्ण संबंध यासह शेजारच्या बांगला देशात निर्माण झालेली अराजकता याचा परिणाम जळगाव च्या सुवर्ण नगरी वर ही पाहायला मिळत असून,गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात तेराशे रुपयांची घट झाल्याने ग्राहकांनी सोन खरेदी साठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे या सगळ्याचा आढावा घेतला आहे चंद्रशेखर नेवे यांनी जागतिक पातळीवर अनेक घडामोडी घडत आहेत त्यातील प्रामुख्याने अमेरिकेत मंदीची लाट येण्याची शक्यता आहे,त्याच बरोबर इराण आणि इजरायल देशात निर्माण झालेला तणाव आणि शेजारच्या बांगला देशात निर्माण झालेली अराजकता याचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरात गेल्या चोवीस तासात तेराशे रुपयांची घट झाली आहे Byte आकाश भंगाळे, संचालक भंगाळे गोल्ड सुशील बाफना,संचालक बाफना ज्वेलर्स सोन्याच्या दरात घट झाल्याने महिलांना मोठा आनंद झाला आहे,आमच्या महिलांना सोन्याचं नेहमीच आकर्षण राहिले आहे,मग गरीब असो की श्रीमंत असो प्रत्येकीला सोन खरेदी करणे आणि दागिने अंगावर घालने हा आवडीचा विषय असतो,त्यामुळे सोन्याचे दर कमी झाल्याने आनंद झाला आहे पुढील काळात रक्षा बंधन कार्यक्रम आहे त्या निमित्ताने अजून सोन खरेदी करता येईल अस सोन खरेदी साठी आलेल्या महिला ग्राहकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत