Jalgaon : गिरीश महाजन,एकनाथ खडसेंचं वाग्युध्द,शब्दांचे बाण टीकेची ढाल : Abp Majha
नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं जुन्या राजकीय वैऱ्यांचा कलगीतुरा राज्यात अनेक ठिकाणी रंगलेला दिसतोय. जळगावातही त्याचा एक अंक काल पाहायला मिळाला. जळगावच्या बोधवडमध्ये भाजप नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर तीव्र शब्दात टीकास्त्र डागलं. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पळायचं आणि मतदारसंघ मात्र भकास अशा शब्दात महाजनांनी एकनाथ खडसेंवर टीका केलेय. आणि त्यानंंतर बोधवडच्या राष्ट्रवादीच्या सभेत खडसेंनी महाजनांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतलाय. टपरीवर फिरणाऱ्याला मंत्री केलं, पण गेले तीस वर्षात तुम्ही मतदार संघात काय केलं असा प्रश्न खडसेंनी विचारलाय.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Eknath Khadse Girish Mahajan Politics एकनाथ खडसे गिरीश महाजन राजकारण ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live राजकारण Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News