Jalgaon Students Drowned in Russia : धक्कादायक! जळगावच्या चार मुलांचा रशियात नदीत बुडून मृत्यू

Continues below advertisement

Jalgaon Students Drowned in Russia : धक्कादायक! जळगावच्या चार मुलांचा रशियात नदीत बुडून मृत्यू

जळगाव : रशिया (Russia) देशातील यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये वैद्यकीय शाखेत शिकत असलेले जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील तीन विद्यार्थी वोल्खोव्ह नदीच्या (Volkhov River) किनारी शहराच्या समुद्रकिनाऱ्याजवळ फेरफटका मारत होते. त्यावेळी लाट येऊन त्यांचा त्यात बुडून मृत्यू (Drown) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या तिघांसोबत असलेल्या विद्यार्थ्यास वाचवण्यात यश आले आहे.  

याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Collector Ayush Prasad) यांनी रशिया येथील दुतावासातील  कुमार गौरव (आय.एफ.एस) यांच्याशी संपर्क करून सर्व माहिती जाणून घेतली. तसेच निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार यांनी पालकांना तिथल्या प्रशासनाशी संपर्क करून दिला आहे.

जळगावातील तिघांचा मृत्यू, एकाला वाचवण्यात यश

याबाबत प्राथमिक माहितीनुसार, हर्षल अनंतराव देसले (भडगाव), जिशान अश्पाक पिंजारी, जिया फिरोज पिंजारी (अमळनेर) हे विद्यार्थी रशियाच्या यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होते. हे तिघे आणि त्यांचे सहअध्यायी विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाच्या मोकळ्या वेळेत संध्याकाळी वोल्खोव्ह नदीच्या किनारी शहराच्या समुद्रकिनाऱ्याजवळ फेरफटका मारत होते. यावेळी एक मोठी लाट आली आणि त्यांना नदीत ओढले. यात तिघांचा मृत्यू झाला. तर एकाला वाचवण्यात यश आले आहे. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram