वसतिगृहात कपडे काढून नृत्य करायला भाग पाडले, आशादीप वसतिगृहातील मुलींचा छळ केल्याचा आरोप
Continues below advertisement
जळगावच्या आशादीप वसतीगृहातील महिला आणि मुलींना पोलीस कर्मचारी आणि बाहेरच्या काही जणांनी नाचवण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. या महिलांनी घडलेल्या प्रकाराची शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांकडे तक्रार केल्याने ही संपूर्ण घटना उघडकीस आली. या महिलांनी आपल्यावर अन्याय अत्याचार केला जात असल्याची तक्रार केली आहे. यामध्ये रात्री काही तरुण पैसे घेऊन या ठिकाणी प्रवेश करून अनैतिक कृत्य करत असल्याचं म्हटलं आहे. इंदूबाई बहुउद्देशीय संघटनेच्या अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्या मंगला सोनवणे आणि जनायक फाउंडेशनचे फिरोज पिंजारी यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देऊन योग्य ती कारवाईची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास आंदोलनचा इशाराही त्यांनी दिला आहे.
Continues below advertisement