Jaitapur Nuclear Power Project : फ्रेंच शिष्टमंडळ अणुऊर्जा प्रकल्पाला भेट देणार ABP Majha
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या बांधणीबाबत आता वेग आला आहे का? असा प्रश्न आता निर्माण होत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे फ्रेंच शिष्टमंडळ 25 मे 2022 ते 27 मे 2022 या दरम्यान रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी ते अणुऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी देखील भेट देणार आहेत. सध्या प्रकल्पाची प्रगती किती आहे? याची काहीही माहिती नाही. पण, फ्रेंच शिष्टमंडळच्या भेटीनं मात्र प्रकल्पाच्या घडामोडींना वेग येणार हे नक्की!