Jaipur 17 Crore Injection : लोक वर्गणीतून उभारले पैसे, 23 महिन्याच्या बाळाला दिलं 17 कोटींचं इंजेक्शन
Continues below advertisement
जयपुरमधील एका २३ महिन्याच्या बाळाला वाचवण्यासाठी तब्बल १७ कोटींचं इंजेक्शन देण्यात आलं आहे. स्पाइनल मस्कुलर एट्रॉपी नावाच्या दुर्मिळ आजाराने पीडित असलेल्या हृदयांशला लोक वर्गणीतून पैसे गोळा करत इंजेक्शन देण्यात आलंय. स्पाइनल मस्क्यूलर एट्रॉपी हा एक अनुवांशिक रोग आहे. या आजारावर वयाच्या २ वर्षापर्य़ंतच उपचार केले जातात. जर या आजारावर वेळीच उपचार न केल्यास तो संपूर्ण शरीरात पसरतो. त्यासाठीच परदेशातून हे खास प्रकारचे इंजेक्शन मागवावं लागतं. आणि आता इंजेक्शन मुळे या मुलाला नवं जीवदान मिळणार आहे.
Continues below advertisement