Jain Protest:'फडणवीस सरकार...', Pune मधील Jain Boarding व्यवहारावरून नाशिकमध्ये सकल जैन समाज आक्रमक
Continues below advertisement
पुण्यातील 'शेठ हिराचंद नेमाचंद जैन बोर्डिंग'च्या (Seth Hirachand Nemchand Jain Boarding) जमीन विक्रीच्या वादग्रस्त व्यवहारामुळे नाशिक आणि पुण्यासह महाराष्ट्रात सकल जैन समाज (Sakal Jain Samaj) आक्रमक झाला आहे. हा वादग्रस्त व्यवहार तात्काळ रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी जैन समाजाने नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या आंदोलनात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) आणि फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पुण्यातील मॉडेल कॉलनी येथील सुमारे साडेतीन एकर जागेचा हा व्यवहार ३११ कोटी रुपयांना एका खाजगी बिल्डरसोबत झाल्याचा आरोप आहे. हा व्यवहार रद्द न झाल्यास १ नोव्हेंबरपासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा जैन समाजाच्या नेत्यांनी दिला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement