Jain Muni Kaivalya Ratna Maharaj एखाद-दुसरं माणूस मेल्यानं काय होतं? - कैवल्य रत्न महाराज
Continues below advertisement
मुंबईतील कबुतरखान्यांच्या मुद्द्यावरून वाद पेटलेला असतानाच जैन मुनी कैवल्य रत्न महाराज यांनी वादग्रस्त विधानं केली आहेत. 'एखाद दुसरी व्यक्ती मेल्यानं काय होतं?', असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे. दादर येथील कबूतर बचाओ धर्मसभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या आजारांवर बोलणाऱ्या डॉक्टरांनाही त्यांनी लक्ष्य केले. 'जे डॉक्टर असं बोलतात, त्यांना मी मूर्ख मानतो', असेही ते म्हणाले. इतकेच नाही, तर कबुतरांच्या विष्ठेमुळे मूत्रपिंड (किडनी) निकामी झालेले रुग्ण बरे होतात, असा धक्कादायक आणि अवैज्ञानिक दावाही त्यांनी केला. कबुतराला राष्ट्रीय पक्षी घोषित करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. त्यांच्या या वक्तव्यांमुळे एका नव्या वादाला तोंड फुटले असून अनेक स्तरातून त्यावर टीका होत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement