TOP 25 Superfast News | टॉप 25 वेगवान घडामोडी | Maharashtra News | 19 Oct 2025 | ABP Majha

Continues below advertisement
बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Election) रणधुमाळीत, तुरुंगातून अर्ज दाखल केलेले उमेदवार धर्मेंद्र क्रांतिकारी (Dharmendra Krantikari) आणि पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) प्रचार सभांची जोरदार चर्चा आहे. 'मला कट करून जेलमध्ये टाकलं, जनता मला मतदान करून बाहेर काढेल', असे स्पष्टीकरण गोपालगंजच्या बरौलीमधून अर्ज भरणाऱ्या धर्मेंद्र क्रांतिकारी यांनी दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २३ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान पहिल्या टप्प्यासाठी १२ प्रचार सभा घेणार आहेत. दुसरीकडे, नाशिकजवळ बिहारकडे जाणाऱ्या कर्मभूमी एक्स्प्रेससमोर येऊन दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. धाराशिवच्या भूम तालुक्यात खंडणीसाठी मिलेश घायवळच्या (Nilesh Ghaywal) साथीदारांनी पवनचक्की कंपनीची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. अमरावतीमध्ये शेफ विष्णू मनोहर (Chef Vishnu Manohar) यांनी सलग पंचवीस तास डोसे बनवण्याचा नवा विश्वविक्रम केला आहे. तसेच, मेक्सिकोमधील पुरात मृतांचा आकडा ७० च्या वर गेला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola