J P Nadda On MLA :सुमार कामगिरी असलेल्या BJP खासदारांचं लोकसभा निवडणुकीत तिकीट कापलं जाण्याची शक्यता
abp majha web team
Updated at:
27 Sep 2023 09:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलोकसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागलेयत... खरंतर निवडणुकीचं बिगुल वाजलं की, उमेदवारी आणि तिकीट वाटपाची चर्चा सुरू होते... भाजपात मात्र, तिकीट कापण्याची मोहीम सुरू असल्याचं बोललं जातंय. सुमार कामगिरी असलेल्या भाजप खासदारांचं येत्या लोकसभा निवडणुकीत तिकीट कापलं जाण्याची शक्यता वर्तवली जातेय... काही खासदारांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचीही माहिती सूत्रांंनी दिलीय.. मुंबईतल्या काही जागांवर बदल केला जाण्याची शक्यता आहे.. दरम्यान, भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि अमित शाह यांनी खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेतलाय.. आणि काही खासदारांच्या कामावर वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती आहे.