Uddhav Thackeray on Democracy : यावेळी ट्रेन सुटली तर देशातून लोकशाही गायब होईल : उद्धव ठाकरे
Continues below advertisement
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. यावेळी लोकशाही जपण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळेच सर्व विरोधक एकत्र आले आहेत. यंदाचं वर्ष निवडणुकीचं आहे. त्यामुळे यावेळी जर गाडी सुटली तर देशातून लोकशाहीच गायब होईल असा सूचक इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. तसंच लोकशाहीला वाचवण्यासाठी देशातून जे लोकशाही हटवू इच्छितात, त्यांनाच मी विरोधी पक्ष म्हणेन असंही उद्धव ठाकरे म्हणाले..
Continues below advertisement