ISIS Maharashtra Module : 'आयसिस'चा महाराष्ट्र मॉड्यूल? NIA च्या कारवाईत सोमवारी 4 जणांना अटक
Continues below advertisement
राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजेच NIA ने सोमवारी गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखाली कारवाई करून आयसिसच्या चार आरोपींना अटक केली. गंभीर बाब म्हणजे याचा उल्लेख NIA ने महाराष्ट्र मॉड्यूल असा केलाय. एनआयएने सोमवारी सकाळी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर छापे टाकल्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली. ताबीश नासेर सिद्दीकी याला मुंबईतील नागपाड्यातून अटक केली. जुबेर नूर मोहम्मद शेख याला पुण्यातील कोंढवा भागातून अटक केली. आणि शरजील शेख तसेच झुल्फिकार अली बडोदावाला यांना ठाण्यातील पडघामधून अटक करण्यात आली. 28 जून 2023 रोजी NIA केलेल्या या कारवाईत आरोपींच्या घरांच्या झडती घेण्यात आल्या. तेव्हा इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि आयसिस संबंधित अनेक कागदपत्रे हस्तगत करण्यात आले.
Continues below advertisement