IRCTC Scam Case : IRCTC घोटाळाप्रकरणात लालूप्रसाद यादव यांच्यावर आरोप निश्चित
Continues below advertisement
बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Elections) रणधुमाळीत, राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष लालूप्रसाद यादव, माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. 'निवडणुका जवळ आल्या की अशा गोष्टी होणार, आम्ही कायदेशीर लढाई लढू,' असे म्हणत तेजस्वी यादव यांनी या कारवाईला राजकीय षडयंत्र म्हटले आहे. दिल्लीच्या राऊत एव्हेन्यू कोर्टाने (Rouse Avenue Court) आयआरसीटीसी हॉटेल घोटाळा (IRCTC hotel scam) प्रकरणात या तिघांविरोधात फौजदारी कट, फसवणूक आणि भ्रष्टाचाराचे आरोप निश्चित केले आहेत. लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना पदाचा गैरवापर करून हॉटेलच्या निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे. आरोप निश्चित झाल्याने यादव कुटुंबासमोरील कायदेशीर पेच वाढला असून, ऐन निवडणुकीच्या काळात RJD समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement