Iqbal Singh Chahal : 31 May पर्यंत मुंबईतील नालेसफाई पूर्ण करणार, दुप्पट वेगानं कामाचे आदेश

Continues below advertisement

मुंबईतल्या नालेसफाईच्या कामावर भाजपनं कडाडून टीका केल्यानंतर आज पालिका प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी मुंबईतल्या नालेसफाईची पाहणी केली. मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून दर पावसाळ्यापूर्वी पालिकेकडून नालेसफाईची कामं हाती घेतली जातात. यंदा नालेसफाईच्या कामांना 15 दिवस उशीरानं सुरुवात झाली. त्यानंतर भाजपनं मुंबई पालिकेवर टीका केली होती. भाजप नेते आशिष शेलार यांनी केलेल्या पाहणीनंतर आज इक्बाल चहल यांनीही पाहणी केली. यंदाच्या नालेसफाईची कामं 31 मे पर्यंत पूर्ण करण्याची सूचना दिली असून दुप्पट वेगानं कामाचे आदेश दिल्याचं इकबाल सिंह चहल यांनी सांगितलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram