International Airlines : कोरोनामुळे ब्रेक लागलेली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून पुर्ववत : ABP Majha
Continues below advertisement
कोरोनामुळे ब्रेक लागलेली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून पूर्ववत होणार आहे. चीन वगळता चाळीस देशांच्या विमानांच्या उड्डाणांना परवानगी देण्यात आलीय. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची व्याप्ती वाढलीय. तसंच जगभरात कोरोना रुग्णांची संख्यादेखील कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यासह देशातील निर्बंधांचे ढग हटलेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने आजपासून आंतरराष्ट्रीय विमानांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला.. तब्बल २५ महिन्यांच्या बंदीनंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु होणार आहे. त्यामुळे परदेशवारी करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय
Continues below advertisement