Mahayuti Politics : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नाईकांची एन्ट्री, महायुतीत नव्या वादाची ठिणगी

Continues below advertisement
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच महायुतीमधील अंतर्गत राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप नेते गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. 'महायुती म्हणून भिडू परंतु पक्षासाठी लढू' अशी काहीशी अवस्था सध्या राज्यातील तिनही पक्षांची झाल्याचं पाहायला मिळतंय. भाजपने आगामी निवडणुकांसाठी निवडणूक प्रभारींची नियुक्ती केली असून, एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्याची जबाबदारी त्यांचे राजकीय विरोधक मानले जाणारे गणेश नाईक यांच्याकडे सोपवली आहे. ठाण्यासह कल्याण, मीरा भाईंदर आणि नवी मुंबईचेही प्रभारीपद नाईकांना देण्यात आले आहे. त्यामुळे मित्रपक्षांची कोंडी करून स्वतःचा राजकीय फायदा करून घेण्यासाठी भाजप रणनीती आखत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola