Success Story: 'एक डबा, एक ध्येय'; Akola चे मामा-भाचे MPSC परीक्षेत यशस्वी, दोघेही झाले Class-1 अधिकारी!
Continues below advertisement
अकोला जिल्ह्यातील शिर्ला गावचे मामा-भाचे राजेंद्र घुगे आणि प्रतीक पारवेकर यांनी एकाचवेळी MPSC परीक्षेत यश मिळवून इतिहास घडवला आहे. 'आईनं हार मानली नाही, म्हणून मी जिंकलो,' अशी भावूक प्रतिक्रिया प्रतीक पारवेकर यांनी निकालानंतर दिली. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आणि आर्थिक अडचणींवर मात करत या दोघांनी हे यश मिळवले आहे. प्रतीक यांचे वडील ते चार वर्षांचे असताना वारले, त्यानंतर त्यांच्या आईने अंगणवाडी सेविकेची नोकरी करून त्यांचे शिक्षण पूर्ण केले. दुसरीकडे, राजेंद्र यांचे वडीलही ते सहा महिन्यांचे असतानाच गेले होते. पुण्यात अभ्यासादरम्यान या दोघांनी एकाच डब्यात जेवण करण्यापासून ते मुलाखतीसाठी एकच सूट वापरण्यापर्यंत अनेक अडचणींचा सामना केला. या अतुलनीय यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement