Sangli Inspirational Wedding: सांगलीत क्रांती प्रेरणा विवाह, कर्मकांडाला फाटा देत अनोखा सोहळा

Continues below advertisement
सांगलीतील क्रांती स्मृती वनात (Kranti Smriti Van) लेफ्टनंट कमांडर हर्षवर्धन आणि प्रियंका यांचा 'क्रांती प्रेरणा विवाह' संपन्न झाला. अनावश्यक कर्मकांड, खर्च टाळून हुतात्म्यांचे स्मरण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश या विवाहातून देण्यात आला. या जोडप्याने सांगितले की, 'कोणतेही कर्मकांड किंवा कोणत्याही प्रकारची पूजा किंवा हवन हे काही होणार नाही आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या साक्षीने आम्ही आज लग्न करतोय'. संपतराव पवार यांनी २००० साली उभारलेल्या या क्रांती स्मृती वनात हुतात्म्यांच्या नावे लावलेली झाडे आता मोठी झाली आहेत, त्यांच्याच साक्षीने हा सोहळा पार पडला. या विवाहाच्या माध्यमातून नव्या पिढीसमोर आदर्श ठेवण्याचा, संविधानिक मूल्यांचे जतन करण्याचा आणि इतिहासाचे स्मरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. देशभक्तिपर घोषणांनी दुमदुमलेल्या या सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola