Praveen Gaikwad Attack प्रवीण गायकवाडांवर हल्ला,भाजपचा हल्ल्याशी संबंध नाही, बावनकुळेंचं स्पष्टीकरण
Continues below advertisement
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. गायकवाड यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बामसेप आणि संभाजी ब्रिगेड यांना संपवण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला. २०१४ पासून पुरोगामी विचारांच्या नेत्यांना संपवण्याचे काम सुरू असून, हल्लेखोर दीपक काटेसारख्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तीला यासाठी निवडले, असे त्यांचे म्हणणे आहे. या हल्ल्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर असल्याचेही त्यांनी म्हटले. हल्लेखोर दीपक काटेवर किरकोळ गुन्हे दाखल झाले असून, गायकवाड यांच्या मते, हा जीवित हानी करण्याचा प्रयत्न होता आणि किमान कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) लावला पाहिजे. मंत्रालयातून काटेला सुरक्षा देण्याबाबत फोन येत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ही नैतिक जबाबदारी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची असल्याचे गायकवाड म्हणाले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचा हल्ल्याशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या हल्ल्याला 'खुनी हल्ला' म्हटले आणि "ही मस्ती थेचली गेली पाहिजे" असे विधान करत विधानसभेत सखोल चौकशीची मागणी केली. आरोपींवर कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हा महाराष्ट्रासाठी लाजिरवाणा प्रसंग असल्याचे म्हटले. काटेकडे यापूर्वी पिस्तूल आढळले होते, अशी पोलिसांची माहिती असल्याचेही सुळे म्हणाल्या.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement