Maharashtra Omicron: ग्रामिण महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरियंटचा शिरकाव, जुन्नरमध्ये 7 जणांना लागण
जगभरात चिंतेचा विषय ठरलेल्या ओमायक्रॉननं ग्रामीण महाराष्ट्रात शिरकाव केलाय. जुन्नरमध्ये ओमायक्रॉनचे तब्बल सात नवे रुग्ण आढळलेत. ओमायक्रॉनबाधित सात जणांपैकी पाच जणांनी लशीचे दोन्ही डोस घेतले होते. सातही जण २ आणि ३ डिसेंबरला यूएईमधून परतले होते. बाधितांच्या संपर्कातील १५ जणांची तपासणी पूर्ण झाली असून अहवालाची प्रतीक्षा आहे. ग्रामीण भागात ओमायक्रॉनने प्रवेश केल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय़. त्यामुळे आता पुणे महापालिकेबरोबरच नगरपालिका प्रशासन अधिक सतर्क झालंय..