Maharashtra Politicsलायकी नसलेला माणूस आमदार, Ramesh Kadam यांचा आमदार Raju Khare यांच्यावर हल्लाबोल
Continues below advertisement
मोहोळ नगरपरिषद (Mohol Nagar Parishad) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार (NCP Sharad Pawar) पक्षात मोठी गटबाजी उफाळून आली आहे. माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) यांनी मोहोळचे विद्यमान आमदार राजू खरे (Raju Khare) यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली. 'शरद पवारांच्या नावावर कोणत्याही पद्धतीचं अस्तित्व लायकी नसलेला माणूस आमदार म्हणून निवडून आणला,' असा घणाघात कदम यांनी केला. खासदार धर्मेश मोहिते-पाटील (Dharmesh Mohite-Patil) यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्ष बैठकीत कदम यांनी हे टीकास्त्र सोडले. विधानसभा निवडणुकीत आपल्या मुलीची उमेदवारी ऐनवेळी बदलण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. मोहोळ नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाले असून, पक्षाने खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे उमेदवारी दिल्यास त्याला विरोध करू, असा स्पष्ट इशाराही रमेश कदम यांनी दिला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement