Indurikar Maharaj: इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा
Continues below advertisement
Indurikar Maharaj: इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या विरोधातील मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निकाल कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. पुत्र प्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणात प्रथम वर्ग न्यायाधीशांचा निकाल औरंगाबाद खंडपीठाने कायम ठेवला होता. त्यामुळे खंडपीठाच्या आदेशाला आव्हान देत इंदोरीकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, खंडपीठाचे निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने इंदोरीकर यांना दणका दिला आहे. त्यामुळे आता इंदोरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Continues below advertisement