Indian Navy : भारताच्या जागतिक दर्जाच्या शक्तिशाली पाणबुड्या, पाकड्यांचा कर्दनकाळ

Continues below advertisement

Indian Navy  : भारताच्या जागतिक दर्जाच्या शक्तिशाली पाणबुड्या, पाकड्यांचा कर्दनकाळ

पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) दहशतवाद्यांना ठेचा, बदला घ्या, पाकिस्तानची कायमची अद्दल घडवा, अशी मागणी भारतभरातून होत आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लष्कराच्या मोठ्या कारवाया सुरू आहेतच, मात्र दहशतवाद्यांचे आका सीमापार पाकिस्तानात आहेत. त्यांना धडा शिकवण्याची तयारी सुरू झालीय. भारताच्या या भूमिकेनंतर पाकिस्तानला धडकी भरल्याचे दिसून येतंय. या आठवड्यात जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करण्याच्या तयारीत पाकिस्तान असल्याची माहिती विशेष सूत्रांकडून मिळत आहे. भारताला चिथावणी देण्याचा निष्काळजी प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. 

पाकिस्तान या आठवड्यात जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्याची तयारी करत असल्याचे कळतंय. हे पाकचं चिथावणी देण्याचे एक निष्काळजी कृत्य असून ही भारताविरुद्ध अत्यंत धोकादायक मोहीम असल्याचं समजतं. विशेष सूत्रांकडून ही माहिती मिळत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून, पाकिस्तानने बेफिकीरपणे नौदलाचे इशारे दिले आहेत. अरबी समुद्रात सराव वाढवला आहे आणि नियंत्रण रेषेवर सतत युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. अशा अस्थिर परिस्थितीत ही नियोजित क्षेपणास्त्र चाचणी ही उघड चिथावणी आहे आणि भारतासोबत तणाव वाढवण्याचा एक हताश प्रयत्न असल्याचे बोललं जात आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola