India vs England Test Series | Oval कसोटीत भारताचा सनसनाटी विजय, मालिका 2-2 बरोबरीत!
भारतीय संघाने ओव्हल कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी इंग्लंडचा सहा धावांनी पराभव केला. यामुळे पाच कसोटी सामन्यांची ही मालिका दोनदोन अशी बरोबरीत सुटली. या कसोटीमध्ये भारताने इंग्लंडला विजयासाठी तीनशे चौर्याहत्तर धावांचे आव्हान दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने चौथ्या दिवसअखेर सहा बाद तीनशे एकोणचाळीस धावांची मजल मारली होती. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी पस्तीस धावांची, तर भारताला विजयासाठी चार विकेट्सची आवश्यकता होती. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या भेदक माऱ्यामुळे विजयाचे दान भारताच्या पारड्यात पडले. इंग्लंडच्या दुसऱ्या डावामध्ये भारताकडून मोहम्मद सिराजनं पाच तर कृष्णानं चार फलंदाजांना माघारी धाडले. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णानं पहिल्या डावामध्ये प्रत्येकी चार विकेट घेतल्या होत्या.