Agni-Prime Missile : रेल्वेतूनही मारा करता येणार असं अग्नी प्राईम क्षेपणास्त्र, चाचणी यशस्वी
भारताने आज अग्नि प्राइम या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र दोन हजार किलोमीटर अंतरावर मारा करण्यास सक्षम आहे. या चाचणीचे वैशिष्ट्य म्हणजे, क्षेपणास्त्र रेल्वेवर बसवलेल्या विशेष यंत्रणेतून डागण्यात आले. युद्धकाळात क्षेपणास्त्राची वेगानं हालचाल करून कमीत कमी वेळात ते शत्रू राष्ट्रावर डागता यावे, यासाठी ही विशेष रेल्वे लाँचिंग यंत्रणा तयार करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे क्षेपणास्त्राची गतिशीलता आणि गुप्तता वाढते, ज्यामुळे शत्रूला त्याचा ठावठिकाणा शोधणे कठीण होते. या यशस्वी चाचणीमुळे भारताच्या संरक्षण क्षमतेत मोठी वाढ झाली आहे. ही चाचणी सर्व तांत्रिक आणि कार्यात्मक मापदंडांवर यशस्वी ठरली आहे. या क्षेपणास्त्राच्या यशस्वी विकासामुळे भारताच्या सामरिक तयारीला बळकटी मिळाली आहे. भविष्यातील सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.