India Russia Oil : भारत सरकार रशियाकडून कच्चं तेल आयात करणार? काय आहे अमेरिकेचं म्हणणं?

एकीकडे तेल आयातीसंदर्भात भारताची रशियासोबत चर्चा सुरू असताना आता अमेरिकेनं याबाबत प्रतिक्रिया दिलेय. भारताने रशिकडून कच्चं तेल खरेदी करण्यास अमेरिकेची हरकत नाही असं व्हाईट हाऊस कडून स्पष्ट करण्यात आलंय. मात्र  सध्याच्या स्थितीत तुम्ही कोणत्या बाजूनं उभे आहात याची इतिहास नोंद घेईल असं म्हणत अमेरिकेनं आपली छुपी नाराजीही व्यक्त केलेय. भारतानं रशियाकडून तेल आयात करणं हे आंतरराष्ट्रीय निर्बंधांचं उल्लंघन होणार नाही असंही अमेरिकेनं स्पष्ट केलंय. मात्र रशियन नेतृत्वाचं समर्थन हे रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचंच समर्थन असेल असंही अमेरिकेनं स्पष्ट केलयं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola