Bhandara : भंडाऱ्यात पहिला उमेदवारी अर्ज दाखल, अपक्ष उमेदवार सुहास फुंडेंनी भरला अर्ज

मागील दोन दिवसांपासून लोकसभेसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.  दोन दिवसात निवडणूक लढू इच्छिणाऱ्या 50 व्यक्तींनी 109 उमेदवारी अर्ज नेलेत. मात्र, दोन दिवसात एकाही उमेदवारानं त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला नव्हता. आज शुक्रवारी तिसऱ्या दिवशी भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी लाखनी येथील सुहास फुंडे यांनी पहिला उमेदवारी नामांकन अर्ज भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून नामांकन अर्ज नेणाऱ्यांमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार मधुकर कुकडे यांचाही समावेश आहे. नाना पटोले यांचे नामांकन फॉर्म भंडारा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पवन वंजारी यांनी तर, खासदार मेंढे यांचे फॉर्म नयन वंजारी यांनी उचललेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola