Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप मागे

जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप पहिल्याच दिवशी मागे घेतलाय. हा संप येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत मागे घेण्यात आला आहे. त्यामुळं राज्यातल्या सर्वसामान्य नागरिकांवरचं टेन्शन दूर झालं आहे. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी या मागणीसाठी राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीमधील जवळपास १७ लाख कर्मचारी संपावर गेले होते. जुन्या पेन्शन योजनेसंदर्भातला अंतिम निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समन्वय समितीच्या शिष्टमंडळाला दिलं. त्यानंतर आता संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली .

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola