IND-W vs SA-W Final: अमोल मुजुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया विश्वविजयासाठी सज्ज, पावसाचं सावट

Continues below advertisement
महिला विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका नवी मुंबईत आमनेसामने येणार आहेत, पण या सामन्यावर पावसाचे गडद सावट आहे. 'पावसामुळे आज आणि उद्याही सामना होऊ शकला नाही, तर भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांना विश्वचषकाचे संयुक्त विजेते घोषित करण्यात येईल', अशी माहिती समोर आली आहे. आयसीसीच्या नियमांनुसार, रविवारी सामना पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल, गरज पडल्यास षटकांची संख्या कमी केली जाईल. सामना थांबल्यास, तो सोमवारच्या राखीव दिवशी त्याच ठिकाणाहून पुढे सुरू होईल. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने ही अंतिम फेरी गाठली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola