Bhavana Gawali Notice from IT : खासदार भावना गवळी यांना आयकर विभागाची नोटीस
Continues below advertisement
खासदार भावना गवळी यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. महिला उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेतील १९ कोटी रुपयांचा हिशोब देण्याबाबत नोटीस बजावली आहे. ५ जानेवारीपर्यंत उत्तर द्यावं, असं नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे. २९ डिसेंबर २०२३ रोजी ही नोटीस मिळाल्याचं कळतंय. याच प्रकरणी ३० ऑगस्ट २१ रोजी ईडीच्या पथकांनी वाशिमच्या रिसोड इथल्या देगावमध्ये कारवाई केली होती. या प्रकरणी खासदार भावना गवळी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
Continues below advertisement