Raj Thackeray : राज ठाकरेंकडून मुंबईतल्या जहांगीर आर्ट गॅलरीतल्या चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन
abp majha web team
Updated at:
31 Jan 2023 11:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतल्या जहांगीर आर्ट गॅलरीत आयोजित एका चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन आज संपन्न झालं. दांडेकर कुटुंबीयांच्या कॅमल आर्ट फाऊंडेशनला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं या चित्रप्रदर्शनाचं आणि विशेष समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. कॅमल आर्ट फाऊंडेशन आणि सर जेजे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं जहांगीर आर्ट गॅलरीत एका चित्रप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. हे प्रदर्शन सहा दिवस चालणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज ठाकरे यांनी चित्रकलेच्या विद्यार्थ्यांंपासून दिग्गज चित्रकारांपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात रंगांची पखरण केल्याबद्दल खास त्यांच्या शैलीत आभार मानले