Maharashtra Weather Update : येत्या दोन दिवसांत कोकण आणखीन तापणार, महाराष्ट्र आणखीन तापणार
राज्यभरात उन्हाच्या झळा चांगल्याच वाढल्या आहेत. काल अकोल्यात सर्वाधिक ४१ अंश सेल्सिअस तापमानांची नोंद झाली आहे. तर अमरावती, वर्धा, मालेगाव आणि सोलापुरातील पारा चाळिशी पार पोहोचलाय. दरम्यान, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रावर हवेच्या वरच्या स्तरात प्रती चक्रवाताची स्थिती तयार झाल्याने पुढील चार दिवस उष्णतेच्या झळाकायम राहण्याचा अंदाज आहे. कमाल तापमानात सरासरी दोन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.