Pandharpur Rangapanchami : रंगांच्या उधळणात रंगली पंढरी, पंढरपुरात रंगपंचमीचा उत्साह
abp majha web team
Updated at:
12 Mar 2023 12:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या देशभरात रंगपंचमीची धूम सुरु आहे... पंढरपुरातही रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली.. त्यामुळे पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात वसंत पंचमी ते रंगपंचमी असा एक महिना रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. जगाच्या पाठीवर एक महिना रंगपंचमीचा सण साजरा करणारं श्रीक्षेत्र पंढरपूर हे एकमेव देवस्थान आहे . या संपूर्ण कालावधीत देवाच्या अंगावर पांढरे वस्त्र परिधान करून त्यावर रोज नैसर्गिक रंगाची उधळण होत असते . याच सोहळ्याचा आज अंतिम दिवस आहे..या दिवसाचा लहानग्यापासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनीच या रंगपंचमीचा आनंद लुटला...