Kolhapur : कोल्हापूरकरांचा नादच खुळा, मुलगी झाली म्हणून हत्तीवरून काढली जंगी मिरवणूक
Continues below advertisement
कोल्हापूरकरांचा नादच खुळा..मुलगी जन्माला आल्यानंतर तिची चक्क हत्तीवरून मिरवणूक काढून स्वागत करण्यात आलं आहे...शिवाय ढोल ताशा आणि मर्दानी खेळ खेळाचे देखील आयोजन करण्यात आले... कोल्हापूरच्या पाचगावमध्ये गिरीश पाटील यांना पाच महिन्यांपूर्वी कन्यारत्न झाले... मुलगी झाली म्हटल्यानंतर अनेक जण नाक मुरडत असतात...मात्र गिरीश पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कन्येचे स्वागत अगदी धुमधडाक्यात करण्याचे ठरवले... यासाठी चक्क हत्तीवरून आणि रथातून मिरवणूक काढण्यात आली... मुलीचे नाव ईरा असे ठेवण्यात आले...लहान लहान मुलांना वेगवेगळ्या वेशभूषेत नटवण्यात आले आहे...त्यांच्या हातात सामाजिक संदेशाचे फलक देण्यात आले...मुलींच्या जन्माबाबत असलेल्या चुकीच्या समजुती दूर व्हाव्यात हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे...
Continues below advertisement