Imtiyaz Jaleel : आमची इच्छा आहे तिसरी आघाडी तयार व्हायला हवी - जलील

Continues below advertisement

Imtiyaz Jaleel : आमची इच्छा आहे तिसरी आघाडी तयार व्हायला हवी - जलील

हेही वाचा : 

अंनिसचे समन्वयक श्याम मानव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरीव 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणावरुन आता चांगलच राजकारण तापलं आहे. न्यायमुर्ती चांदीवाल चौकशी अहवाल हा महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) कार्यकाळात आला होता, असा  दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. आता, त्यावरुन अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना थेट माजी पोलीस महासंचालक परमबीरसिंह (Param bir singh) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आता, अनिल देशमुख यांनी केलेले आरोप फेटाळत, देशमुख यांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे, त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, अशा शब्दात परमबीरसिंह यांनी माजी गृहमंत्र्यांवर पलटवार केला आहे. त्यामुळे, राज्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणावरुन राजकीय वादंग निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

अँटिलिया जिलेटीन कांड्या प्रकरणात परमबीर सिंह यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत डील झाली आहे, ते गुप्तपणे भेटत होते, असा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी केला होता. आता, या आरोपावर परमबीर सिंह यांनी एबीपी माझाशी संवाद साधत आरोप फेटाळले आहेत. तसेच, याप्रकरणी माझी प्रथम एटीएस चौकशी झाली, मग एनआयएने केली, मी चौकशीला सामोरा गेलो, पण तपासात काहीच आलं नाही. माझ्यावर केलेले आरोप निराधार आहेत, पुरावे असतील तर ते आणून द्यावेत. अन्यथा, मी बाकीचे कांड बाहेर काढेन, असा इशाराच परमबीर सिंह यांनी दिला आहे. तसेच, आता जे समोर आलंय ते 10 टक्के आहे. बाकी पोलीस अधिकारी ज्यांना अनिल देशमुख यांनी सतावलं त्यांनी समोर येण्याची हिंमत केली नाही. सलील देशमुख, अनिल देशमुख,  संजय पांडे आणि माझी एकाच दिवशी नार्को टेस्ट करा, मी नार्को टेस्टसाठी तयार आहे, असे परमबीर सिंह यांन म्हटले. आपण नार्को टेस्टचं आव्हान स्वीकारतो आणि एकाच दिवशी आमची सर्वांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणीही सिंह यांनी केली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram