Imtiaz jaleel : एमआयएमचा Chhatrapati Shahu Maharaj यांना पाठिंबा,कोल्हापुरात निवडणुकीचं गणित बदलणार?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppImtiaz jaleel : एमआयएमचा Chhatrapati Shahu Maharaj यांना पाठिंबा,कोल्हापुरात निवडणुकीचं गणित बदलणार?
राज्यात सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. प्रत्येक उमेदवार आपापल्या मतदारसंघात जोमाने प्रचार करतोय. काहीही झालं तरी मीच विजयी होणार, असा दावा प्रत्येक उमेदवाराकडून केला जातोय. मतदारसंघात ताकद वाढवण्यासाठी वेगवेगळ्या नेत्यांच्या पाठिंब्यासाठी उमेदवारांकडून प्रयत्न केला जातोय. या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघाची विशेष चर्चा होत आहे. कारण या जागेवर राजघराण्यातील छत्रपती शाहू महाराज निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या जागेवर नेमका कोणाचा विजय होणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. दरम्यान, या निवडणुकीत शाहू महाराजांची ताकद चांगलीच वाढली आहे. कारण या जागेसाठी त्यांना एमआयएमने पाठिंबा दिला आहे.