मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे, मोदी फडणवीसांना ठाकरेंचा टोला
दरवर्षी शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा यंदा कोरोना काळात बंद हॅालमध्ये कमी लोकांच्या उपस्थित होत आहे. भाषणाच्या सुरुवातीपासूनच मुख्यमंत्र्यांनी भाजपला लक्ष्य करायला सुरुवात केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हिंदूत्वावरुन राष्ट्रीय स्वंयसेवक संघ, भाजप यांच्यावर टीकास्त्र सोडलं. हिंदूत्व धोक्यात आहे ते परक्यांपासुन नाही तर ह्या नवहिंदूंपासुन आहे, अशी खरमरीत टीका उद्धव ठाकरे यांनी केली.