रेमडेसिवीर मिळाले नाही तर कोरोनाबाधितांसह मातोश्रीवर ठाण मांडू, सदाभाऊ खोत यांचा राज्य सरकारला इशारा
सातारा : दोन दिवसात रेमडेसिवीर इंजेक्शन लोकांना मिळाले नाही तर कोरोनाग्रस्तांसह मातोश्रीवर ठाण मांडणार असल्याचा इशारा आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. ते साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. सदाभाऊ खोत म्हणाले की, महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्यामुळे कोरोनाचा मृत्यू दर वाढत आहे. या मृत्यूला जबाबदार ठाकरे सरकार आहे, असं ते म्हणाले.