#Lockdown कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास अनेक निर्बंध नव्याने लावणार,मंत्री विजय वडेट्टीवार यांचा इशारा

Continues below advertisement

Mumbai Corona Cases :  राज्यात आणि विशेषकरुन मुंबईत कोरोनानं प्रकोप केला होता. यात मुंबईमध्ये तर कोरोनानं सर्वात जास्त कहर केला. आता मुंबईतील आकडा हा एक हजारांच्या देखील आता आला आहे.  मुंबईत गेल्या 24 तासात 696 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 658  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आजवर 6,81,946 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर हा आता 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईतील  एकूण सक्रिय रुग्णसंख्या सध्या 15,819 इतकी आहे. तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 598 दिवसांवर पोहोचला आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram