Pratap Chikhlikar Offer : अशोकराव चव्हाण भाजपमध्ये आल्यास स्वागत- चिखलीकर
नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अशोक चव्हाण यांना ऑफर दिलीय. चव्हाण भाजपमध्ये आल्यास स्वागत करु असं चिखलीकरांनी म्हटलंय... बहुमत चाचणीला गैरहजर राहून आणि संभाजीनगरला पाठिंबा दिल्याबद्दलही चव्हाणांचे आभार असं वक्तव्य चिखलीकर यांनी केलंय