Ibrahim Musa on Amol Kiritkar : मी अमोल किर्तीकरांना दुसऱ्यांदा भेटलो, इब्राहिम मुसा काय म्हणाला?

मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे वायव्य मुंबईचे उमेदवार अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांच्या रॅलीमध्ये 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी इब्राहिम मुसा उर्फ बाबा चौहान सामील झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. त्याला इब्राहिम मुसाने उत्तर दिलं  आहे. अमोल कीर्तीकर यांच्याशी माझी ओळख नाही, जिथून रॅली जात होती त्या रस्त्याच्या कडेला उभारलो होतो असं इब्राहिम मुसाने स्पष्टीकरण दिलं आहे. इब्राहिम मुसाला आपण ओळखत नसल्याचं स्पष्टीकरण या आधीच अमोल कीर्तिकरांनी दिलं होतं. 

काय म्हणाला इब्राहिम मुसा?

अमोल कीर्तीकर यांच्याशी माझी ओळख नाही. एका लग्नात मी त्यांना दोन मिनिटांसाठी भेटलो होतो. अमोल कीर्तिकर यांची रॅली जात होती त्या ठिकाणी मी बाजूला उभा होतो. मी त्या रॅलीत गेलो नव्हतो किंवा मला कुणी बोलावलं नव्हतं. मी त्या रॅलीत असतो तर माझ्यासोबत आणखी काही लोक असते. मोसिन हैदर नावाचे नगरसेवक यांनी मला हाक मारल्यामुळे मी त्या ठिकाणी गेलो आणि त्यांना भेटलो. त्यानंतर मी निघून गेलो.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola