Hyderabad Gazetteer GR Challenge | Hyderabad Gazetteer GR ला हायकोर्टात आव्हान, मराठा-OBC संघर्ष तीव्र

Continues below advertisement
हैदराबाद गझेटियर निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होत आहे. दोन सप्टेंबरचा शासन निर्णय असंवैधानिक असून तो रद्द करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. कुणबी सेना, महाराष्ट्र वाळी समाज महासंघ, अहिर सुवर्णकार समाज संस्था, महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि सदानंद मंडलिक यांनी रिट याचिकांद्वारे या शासन निर्णयाला आव्हान दिले आहे. दोन सप्टेंबर रोजी शासनाने "हैदराबाद गझेटियर" लागू करण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामुळे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे. मनोज जरांगे यांनी "हैदराबाद गझेटियर" लागू करण्याच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन आणि उपोषण केले होते. शासनाच्या निर्णयानंतर त्यांनी उपोषण सोडले. मराठा मंत्रिमंडळ समिती आणि अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे ओबीसी समाजात रोष निर्माण झाला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देण्याची मागणी ओबीसी समाजाकडून केली जात आहे, तर मराठा समाज कुणबी म्हणून ओबीसी प्रवर्गात आरक्षणाची मागणी करत आहे. दोन सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची मागणी हायकोर्टात केली जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola