Human-Leopard Conflict: Nashik च्या Devgaon मध्ये बिबट्या जेरबंद, ठार मारण्यासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन.
Continues below advertisement
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील निफाड (Niphad) तालुक्यातील देवगाव (Devgaon) येथे दहशत निर्माण करणारा बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. या बिबट्याला इतरत्र न सोडता जागीच ठार करावे, या मागणीसाठी स्थानिक ग्रामस्थ आणि विद्यार्थी आक्रमक झाले, त्यांनी रास्तारोको आंदोलन करत वनविभाग आणि पोलिसांच्या गाडीला घेराव घातला. एका विद्यार्थ्याने सांगितले, 'प्रशासनाकडे हीच मागणी आहे की या बिबट्याचा जो बंदोबस्त आहे तर तो लवकरात लवकर केला पाहिजे कारण नाहीतर मग जे आम्ही मुलं आहोत तर आम्ही शाळा बंद करू.' बराच वेळ चाललेल्या या आंदोलनानंतर, अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यावर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement