Sangli : वीजेचा दाब वाढल्यानं 600 हून अधिक घरातील टीव्ही, फ्रिजसह इतर उपकरणं खाक
Continues below advertisement
Sangli News : दुष्काळात तेरावा महिना या म्हणीचा प्रत्यय सध्या सांगलीकर घेत आहेत. एकीकडे महागाईनं डोकं वर काढलंय आणि दुसरीकडे वीजबिलही जास्त येत आहे. त्यातच सांगलीतल्या गणेशनगर भागातील जवळपास 600 घरांना विजेच्या उच्च दाबामुळे मोठा फटका बसला आहे. घरातील टीव्ही, फ्रीज अशी विद्युत उपकरणं जळून खाक झाली आहेत. कोरोना, लॉकडाऊन, अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या या कुटुंबांना आता घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्त अथवा नवीन आणण्याची वेळ आली आहे. नुकसानाचा आकडा देखील मोठा असल्यानं महावितरणकडून नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा या सामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे.
Continues below advertisement