Dhule : धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी आणि व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी
एकीकडे संपूर्ण राज्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होत असताना निर्बंध शिथिल केले जात आहेत. तसेच व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी वेळ वाढवून देण्यात आली आहे, मात्र दुसरीकडे नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. मंगळवारी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी आणि व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी सोशल डिस्टंसिंगचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.