बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 40 टक्के प्रयोगांवरच आधारित, विषय शिक्षकच बजावणार परीक्षकाची भूमिका
Continues below advertisement
बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा यावर्षी अभ्यासक्रमातील 40 टक्के प्रयोगांवरच आधारित असेल. विज्ञान शाखेतील विषयनिहाय प्रयोगांची संख्या कमी करण्यात आलीय. याशिवाय अंतर्गत आणि बाह्य परीक्षकाचं काम त्या विषयातील शिक्षकानंच करावं अशी सूचना राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं केली आहे. कोरोना संकटामुळे बारावीचे वर्ग उशिरा सुरु झाले. त्यामुळे प्रत्यक्ष प्रयोगशाळेत प्रात्यक्षिकं पूर्ण करता आलेली नाहीत. ही बाब लक्षात घेऊन शिक्षण मंडळानं प्रात्यक्षिकांची संख्या कमी केली आहे. याशिवाय आर्टस्, कॉमर्स आणि व्यावसायिक शाखांतील विविध विषयांची श्रेणी, तोंडी आणि इतर अंतर्गत मूल्यमापनाची जबाबदारी शाळा आणि ज्युनियर कॉलेजवरच असणार आहे.
Continues below advertisement